हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर नसल्याने ६६ वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू

मुंबई - कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत, हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, अशी मुंबईतील अनेक हॉस्पिटलमधील सद्यस्थिती आहे. वर्सोवा, यारी रोड येथील ६६ वर्षीय कोरोना रुग्णांला चक्क कांदिवलीच्या कामगार विमा योजनेच्या (इएसआयएस) हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या या हॉस्पिटलमध्ये सुमारे ७० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, त्यातील बहुसंख्य रुग्ण पालिकेचे आहेत.वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अन्य मान्यवरांना ट्विट करून उजेडात आणली. सदर व्यक्ती उपचारासाठी इतर हॉस्पिटलमध्ये गेली होती. मात्र, त्याला बेड मिळाला नाही.त्यामुळे अखेर कांदिवली (पूर्व) येथील इएसआयएस हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. मात्र, या हॉस्पिटलमध्ये त्याला व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने रविवारी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती आमदार लव्हेकर यांनी दिली.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget