कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाावामुळे जगातील विकसित देशांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे.परंतु, भारतात तशी वेळ येणार नाही, असे वाटते. तरीही आपण संपूर्ण देशात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.
डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, आपल्या देशात कोरोनाचा मृत्यूदर ३.३ टक्के इतका आहे. तर कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण २९.९ टक्के इतके आहे. हे चांगल्या परिस्थितीचे द्योतक आहे. याशिवाय, सध्याच्या घडीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची कालावधी ९.९ दिवस इतका आहे. गेल्या तीन दिवसांचा विचार करता हा कालावधी ११ दिवसांचा झाल्याची माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली. 
गेल्या २४ तासांमध्ये देशात ३३२० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ५९ हजार ६६२ इतकी झाली आहे. यापैकी ३९ हजार ८३४ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १७ हजारहून अधिक लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget