साखर उद्योगाला आर्थिक मदत करा; शरद पवारांची पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे विनंती

मुंबई - करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन आहे. अर्थचक्र थांबल्यामुळे अनेक उद्योगधंदेही संकटात सापडले आहेत. दरम्यान, राज्यातील सारख उद्योगासमोरही मोठे संकट उभे राहिले असल्याचे सांगत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. लॉकडाउनमुळे साखर कारखान्यांसमोर संकट उभे राहिले असून त्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी पवार यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
२०१८-१९ आणि २०१९-२० पासून प्रलंबित असलेले निर्यात प्रोत्साहन भत्ते आणि बफर स्टॉक क्लिअरिंगच्या खर्चासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी शरद पवार यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच साखरेच्या हमीभावातही ग्रेडनिहाय वाढ करण्यात यावी. ती ३ हजार ४५० रूपयांपासून ३ हजार ७५० रूपयांपर्यंत असावी, गेल्या दोन वर्षांमध्ये गाळप केलेल्या ऊसाला सरासरी ६५० रूपये प्रतिटन अनुदानाची तरतूद करण्यात यावी, अशा मागण्याही त्यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत. खेळत्या भांडवाल्याच्या थकबाकीचे अल्पमुदतीच्या कर्जात रुपांतर करा, तसेच मित्रा समितीने सुचवल्याप्रमाणे कर्जाच्या परतफेडीला दोन वर्षांची स्थगिती देत सर्व प्रकारच्या कर्जाची दहा वर्षांसाठी फेररचना करावी. साखर उद्योगांच्या डिस्टिलरीजना स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट आणि स्टँट अलोन बेसिसवर मानून बँकांनी २०१८ मध्ये केंद्र सरकारद्वारे घोषित करण्यात आलेल्या ‘लोन सब्वेंशन कॅम्पस स्कीम’नुसार इथेनॉल प्रकल्पांनाही आर्थिक सहाय्य केले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget