बीडमध्ये शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड

बीड - देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून,.माणसे एकमेकांना मदतीचा हात देत आधार देत असतानाच दुसरीकडे बीडमध्ये मात्र वादातून तिहेरी हत्याकांड झाल्याने बीड हादरले आहे.शेतीच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. तिथे झालेल्या वादातून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मांगवडगाव इथे घडली आहे.
मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला. या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासणी केली. जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल तर ३ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे.अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget