अम्फान चक्रीवादळ ; केंद्राकडून ओडिशासाठी ५०० कोटींची मदत

भुवनेश्वर - बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अम्फान चक्रीवादळाने ओडिशाच्या किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशाची पाहणी केली. त्यांनी आता ओडिशाला ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान मोदींनी ओडिशा आणि पश्चिम बंगालची हवाई पाहणी केली होती. त्यानंतर घेतलेल्या आढावा बैठकीत मदतीची घोषणा करण्यात आली. या मदतीबाबत स्पेशल रिलीफ फंडचे अध्यक्ष पी. के. जेन यांनी एक ट्विट केले. ओडिशा सरकारने पुनर्वसन कार्य हाती घेतले आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या १० जिल्ह्यामध्ये हे काम सुरू झाले आहे, अशी माहिती जेना यांनी दिली.
ओडिशातील पुनर्वसन कार्यात मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे १९ युनीट, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दलाचे १२ युनीट आणि अग्निशामक दलाचे १५६ गट १० जिल्ह्यामध्ये तैनात आहेत. बालासोर, भद्रक, केंद्रापरा आणि जगतसिंगपूर हे चार जिल्हे वादळी वारे आणि मुसळधार पावसाने पूर्णपणे कोलमडले आहेत. १० जिल्ह्यांतील ४४ लाख ४४ हजार ८९६ नागरिक अम्फान चक्रीवादळाने प्रभावित झाले आहेत.दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आभार मानले आहेत. आपण सर्व मिळून या आपत्तीचा सामना करू असे पटनायक म्हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget