मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली महाविकास आघाडीची बैठक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ मेनंतर लॉकडाऊनचे ४ संकेत दिले असताना, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल? याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. या बैठकीला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.
मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरू करता येतील? यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथनही झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबतचे नियम १८ मेपूर्वी जाहीर करू, असे त्यांनी सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.देशातील तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपणार आहे. मात्र, त्यापुढील म्हणजे चौथ्या लॉकडाऊनची रणनीती कशी असेल? कुठे शिथिलता द्यायची? उद्योगधंदे कसे सुरू करायचे? कुठे सुरू करायचे? अशी सर्वव्यापी चर्चा या बैठकीत झाली.आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अतिवृष्टी तसेच राज्यातील खरिपाच्या संदर्भातही बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget