पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकास दोन दिवसांची कोठडी

गडचिरोली - पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस उपनिरीक्षक धनराज बाबुलाल शिरसाठ (रा. वराड, ता.धरणगाव जि. जळगाव), त्याची प्रेयसी महिला पोलीस कॉन्स्टेबल, धनराजचे वडील बाबुलाल नामदेव शिरसाठ, आई सुशीलाबाई या चौघांविरुध्द मुलचेरा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ८ मे रोजी दाखल केला गेला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी धनराज शिरसाठला पोलिसांनी तब्बल ४ दिवसानंतर अटक केली.
मंगळवारी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान, नागपूर येथील ‘वी फॉर चेंज' या महिलांवरील अत्याचारांविरोधात लढणाऱ्या संघटनेने या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे सोमवारी तक्रार दाखल केल्यानंतर लगेच काही तासातच महिला आयोगाने याची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांना विस्तृत चौकशीचे आदेश दिले आहेत. गडचिरोली पोलीस दलात मुलचेरा पोलीस स्थानकामध्ये उपनिरीक्षक पदावर असलेल्या धनराज शिरसाठ याची पत्नी संगीता हिने ७ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास मुलचेरा येथील पोलीस निवासात एके-47 या रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती.मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी असलेल्या विवाहबाह्य संबंधामुळे संगीता शिरसाठ हिला धनराज घटस्फोटासाठी त्रास देत होता. त्यातून संगीता हिने आत्महत्या केल्याची तक्रार संगीताचा भाऊ गणेश दगडू सपके (लक्ष्मी नगर, जळगाव) याने दिल्यानंतर ८ मे रोजी धनराज शिरसाठ, प्रेयसी महिला पोलीस शिपाई, धनराजचे वडील व आई या चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर संगीता हिचा मृतदेह चंद्रपूर येथून शनिवारी जळगावात आणण्यात आल्यानंतर तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश सपके याने दिलेल्या तक्रारीत, धनराज याला संगीतापासून घटस्फोट हवा होता. त्यासाठी त्याने बैठकीत कोरा धनादेश देऊन त्यावर रक्कम टाकण्याचे सांगितले होते. मुलचेरा येथे या महिला कर्मचाऱ्याच्या घरातून धनराज याला बाहेर काढले असता, संगीता हिचे केस धरून ओढत आणून बेदम मारहाण केली होती व आम्ही दोघे लग्न करणार असल्याचे तेव्हाही धनराज याने सांगितले होते, असे म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget