अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची पंतप्रधानांकडे केली मागणी

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत पाचव्या वेळेस चर्चा केली. कोरोना गावांमध्ये पोहोचता कामा नये असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. यावेळी अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. तर काही राज्य लॉकडाऊन वाढवू नये या मागणीवर ठाम होते. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी सल्ला मागितला. विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावर आपल्या सूचना मांडल्या. लॉकडाऊन संदर्भात विषय आल्यावर सध्या लॉकडाऊन सुरुच राहावा अशी मागणी काही मुख्यमंत्र्यांनी केली. 
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी लॉकडाऊन पुढे वाढवण्याची मागणी केली. आर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी योजना आखावी या मागणीवर त्यांनी जोर दिला. एग्झिट प्लान बनवण्याची मागणी देखील त्यांनी केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. लॉकडाऊन वाढवल्याशिवाय पुढे जाणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. जूनमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनवर कोणताही निर्णय हा विचारपूर्वक व्हायला हवा असे ते म्हणाले.लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसाठी ट्रेन सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget