सिनेनगरी पुन्हा झगमगणार ; सिनेचित्रीकरणास सशर्त परवानगी

मुंबई - सिनेनगरी पुन्हा एकदा लवकरात लवकर झगमगून उठणार आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईतील चित्रपट निर्माते, कलाकार, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रीकरणाला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने रविवारी निर्णय जाहीर केला असून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिका यांच्या चित्रीकरणास सशर्त मान्यता देण्यात आली आहे.
दोन महिन्यांहून अधिक काळ चित्रीकरण बंद असल्याने अनेक चित्रपट-मालिकांचे चित्रीकरण रखडले आहे. अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले असले तरी पोस्ट प्रॉडक्शनची कामे खोळंबली आहेत. या सगळ्या कामांना गती मिळावी, यासाठी मराठी कलाकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनचे सदस्य आणि काही निर्मात्यांचीही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत ठरवल्यानुसार गेल्या आठवडय़ात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि प्रोडय़ूसर्स गिल्डने चित्रपटनिर्मितीशी संबंधित प्रत्येक विभागात काय काळजी घेऊन चित्रीकरण करता येईल, यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे, उपाययोजना यांचे ३७ पानी सादरीकरण केले होते. या सगळ्यावर विचारविनिमय करून शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्मात्यांना चित्रपटनिर्मितीपूर्वीची आणि नंतरची कामे करता येतील, असे नमूद करण्यात आले आहे. नियमांनुसार चित्रीकरण न झाल्यास कामे बंद करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget