अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे ; सर्व कर्मचारी कामावर रूजू

मुंबई - करोना काळात अत्यावश्यक सेवा बजावत असतानाही कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने आजपासून बेमुदत बंद पुकारला होता. यासंदर्भात मागणी करून दोन दिवस उलटल्यानंतरही बेस्ट उपक्रमाकडून चर्चेसाठी प्रतिसाद न मिळाल्याने बेस्टचे कर्मचारी ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ या सरकारच्या घोषणेचा अवलंब करून कामावर रुजू होणार नसल्याचेही सांगण्यात आले होते. परंतु महाव्यवस्थापकांच्या आवाहनानंतर अखेर हे आदोलन मागे घेण्यात आले आहे.
बेस्टच्या महाव्यवस्थापकांनी अत्यावश्यक सेवांच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत कामावर रुजू होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ६० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. त्यानंतर संपूर्ण कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘बेस्ट’ उपक्रमातील जवळपास शंभरहून अधिक कर्मचारी आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची आसपासच्या शहरांतून आणि मुंबईतून ने-आण करत असताना या कर्मचाऱ्यांना लागण झाल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
सध्याच्या परिस्थितीत बंद पुकारणे योग्य नसल्याचे सांगत शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने वेगळी भूमिका घेतली होती. या बंदला कामगार सेनेचा पाठिंबा नसून कर्मचारी कामावर येतील, असे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले होते. ‘बेस्ट प्रशासन करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देत आहे. याशिवाय दहा लाखांपर्यंत विमाही आहे व अन्य उपाययोजनाही करत आहे. मग बंद करून काय साधणार,’ असा सवालही त्यांनी केला होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget