गेल्या २४ तासात रेल्वेच्या १३ लाख तिकीटांची विक्री

मुंबई - भारतीय रेल्वेने १ जूनपासून २३० प्रवासी गाड्या चालवण्याची घोषणा केली असून त्यासाठी तिकिटांचे बुकिंग गुरुवारी सुरू झाले. आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या २४ तासात या २३० गाड्यांसाठी १३ लाखाहून अधिक तिकिटे बुक केली गेली आहेत.शुक्रवारी रेल्वेने सांगितले की, "देशातील वेगवेगळ्या स्थानकांना जोडणार्‍या २३० प्रवासी गाड्यांमध्ये सर्व प्रकारच्या श्रेणीसाठी रेल्वे तिकिटांचे बुकिंग सुरू केले आहे. आरक्षित तिकिटे ऑनलाईन बुकिंग व रेल्वे आरक्षण काउंटरद्वारे बुक करता येतील. कालपासून १३ लाखाहून अधिक प्रवाशांनी तिकिटे बुक केली आहेत. यापूर्वी गुरुवारी तिकिटांचे बुकिंग सुरू होताच पहिल्या तासामध्ये दीड लाख तिकिटे बुक करण्यात आली. त्याचबरोबर पहिल्या अडीच तासात ४ लाख तिकिटे बुक करण्यात आली.
या २३० गाड्यांसाठी रेल्वेने तिकिट काउंटर देखील उघडले आहेत. त्याशिवाय आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतात. एवढेच नाही तर पोस्ट ऑफिस, पॅसेंजर तिकीट सुविधा केंद्र (वायटीएसके), पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम (पीआरएस) आणि कॉमन सर्व्हिस सेंटरमधूनही तिकिटे बुक करता येतील.रेल्वेने निर्णय घेतल्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या गाड्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात नेण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या लेबर स्पेशल ट्रेन आणि दिल्ली ते इतर शहरांमध्ये धावणाऱ्या एसी विशेष गाड्यां व्यतिरिक्त असणार आहेत. यापूर्वी रेल्वेने ३० जूनपर्यंत सर्व नियमित प्रवासी गाड्या रद्द केल्या आहेत.'या २३० गाड्या चालविल्यामुळे जे प्रवासी काही कारणास्तव विशेष गाड्यांची सुविधा घेण्यास असमर्थ आहेत त्यांनाही मदत होईल. रेल्वेने असे सांगितले की ते (प्रवासी) जवळच्या रेल्वे स्थानकातून रेल्वे पकडू शकतील असा प्रयत्न केला जाईल.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget