'मी ठणठणीत बरा', अफवा पसरवणाऱ्यांना अमित शाहांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली - “माझी तब्येत पूर्णपणे ठणठणीत बरी असून मला कुठल्याही आजाराची लागण झालेली नाही. सोशल मीडियावर माझ्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. काही लोकांनी तर ट्विटवर माझा मृत्यू व्हावा, यासाठीदेखील प्रार्थना केली आहे”, असे स्पष्टीकरण अमित शाह यांनी ट्विटरवर दिले आहे. अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत काही लोकांकडून सोशल मीडियावर अफवा पसरवली जात आहे. या अफवा पसरवणाऱ्यांनाच अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 
“देश सध्या कोरोनाशी झुंजत आहे. देशाचा गृहमंत्री या नात्याने मी दररोज उशिरा रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. सुरुवातीला या अफवांकडे मी लक्ष दिले नाही. लोकांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर जी अफवा पसरली आहे त्याचा त्यांना आनंद घेऊ द्यावा, असे मला वाटत होते”, असे अमित शाह म्हणाले.या अफवांमुळे भाजप पक्षाचे अनेक कार्यकर्ते चिंतेत पडले. ते सोशल मीडियामार्फत तब्येतीची विचारपूस करु लागले. त्यांच्या चिंतेकडे मी दुर्लक्ष करु शकत नाही. त्यामुळे मी यावर स्पष्टीकरण देत आहे. मी पूर्णपणे ठणठणीत बरा असून मला कुठलाही आजार झालेला नाही”, असे स्पष्टीकरण शाहांनी दिले.याशिवाय ज्या लोकांनी अफवा पसरवल्या आहेत त्यांच्याबाबत माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा राग किंवा द्वेष नाही. मी आपला सर्वांचा आभारी आहे, असेदेखील अमित शाह म्हणाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget