देशातील सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा - प्रकाश आंबेडकर

मुंबई - केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे आहे. असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त केली आहे. सर्व धार्मिक स्थळांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची आहेत,सरकारने हिम्मत दाखवावी आणि सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले असून हे सरकार गरिबांचे नसून श्रीमंतांचे असल्याची टीका करतानाच मोदींनी कोरोनाला भारतात आणले असून कोरोनामुळे मृत कुटुंबियांच्या नातेवाईकांनी मोदींवर ३०२चा गुन्हा दाखल करावा.
परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन न केल्यामुळे देशात कोरोनचा प्रसार झाला. यासाठी सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले.कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता. यासाठी मोदी सरकार जबाबदार आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget