कोरोनामुळे शहीद जवानाच्या पोलीस पत्नीचा मृत्यू

ठाणे - ठाणे पोलीस दलातील कोरोनाची लागण झालेल्या एका ४४ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गुरुवारी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या पोलिस शिपाई म्हणून ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. २७ मार्चपासून वैद्यकीय रजेवर असलेल्या या महिला पोलीस कर्मचाऱ्यास मूत्रपिंडाचा आजार होता.१९ मे रोजी या महिला पोलीस कर्मचाऱ्यास ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार चालू असताना दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोनाशी झुंज देत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्या वागळे इस्टेटमधील कैलासनगरमध्ये राहत होत्या. कोरोना बाधित महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची राज्यातील पहिलीच घटना असून यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
आतापर्यंत ठाणे पोलिस दलातील ७२ कर्मचारी आणि ११ अधिकारी अशा एकूण ८३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर, १० अधिकारी आणि २७ कर्मचारी असे एकूण ३७ कर्मचारी बरे झाल्याची माहिती ठाणे पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत ठाणे पोलिस दलातील एकाही कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर महिला पोलिसाचा मृत्यू चिंतेत भर घालणारा ठरला आहे.
मृत महिला पोलिस कर्मचाऱ्याचे पती एसआरपीएफ जवान होते. मात्र नक्षलवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना ठाणे पोलिस दलात अनुकंपा तत्वावर घेण्यात आले. या महिला पोलिस शिपायास दोन मुलगे असून एक २४ वर्षांचा आणि दुसरा २० वर्षांचा आहे, असे श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget