तबलिगी प्रकरणी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल,१२ जूनला सुनावणी

नवी दिल्ली - व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करून दिल्लीच्या निझामुद्दीन मरकज येथील धार्मिक मेळाव्यात सहभागी झाल्याबद्दल, बेकायदेशीररीत्या धर्मप्रचाराच्या उपक्रमांत भाग घेतल्याबद्दल आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी ८२ विदेशी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र सादर केले.पोलिसांनी २० देशांच्या नागरिकांविरुद्ध २० आरोपपत्रे दाखल केले असून, आरोपपत्रांवर विचार करण्यासाठी महानगर दंडाधिकारी सायमा जमील यांनी हे प्रकरण १२ जूनला ठेवले आहे.
आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, आरोपींपैकी चौघे अफगाणिस्तानातील, ब्राझील व चीनमधील प्रत्येकी ७, अमेरिकेतील ५, ऑस्ट्रेलिया, कझाकस्तान, मोरोक्को व ब्रिटन येथील प्रत्येकी ५, अल्जेरियातील ८, सौदी अरेबियातील १०, फिजीतील १४, सुदान व फिलिपाइन्समधील प्रत्येकी ६ आणि युक्रेन, इजिप्त, रशिया, जॉर्डन, फ्रान्स, ट्युनिशिया व बेल्जियम येथील प्रत्येकी १ आरोपी आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget