राज्यातील ऑरेंज,ग्रीन झोनमधील दारूची दुकाने सुरू होणार

मुंबई - दारूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या आदेशाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दारूची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
रेड झोनमधील कंटेनमेंट क्षेत्र वगळता इतर ठिकाणची दारूची दुकाने सुरू ठेवायची की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी सोमवारी बैठक होणार आहे.त्यामुळे मुंबईकरांच्या नजरा या निर्णयाकडे लागून आहेत.ऑरेंज, ग्रीन झोनमधील दारू दुकाने सुरू ठेवताना एका वेळी ५ जण रांगेत उभे राहू शकतील असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्राहकांना सहा फूट अंतर ठेवून रांग लावावी लागणार आहे.राज्यात ३ मे नंतर लॉकडाऊन वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करताना लॉकडाऊनमध्ये झोन निहाय शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार कोणत्या गोष्टींसाठी शिथिलता मिळाली हे समजून घेणे महत्वाचे आहे. 
रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका या क्षेत्रात मात्र लॉकडाऊनमध्ये कुठलीही शिथिलता देण्यात आलेली नाही.रेड झोनमधील मुंबई, एमएमआर, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि मालेगाव महापालिका ही क्षेत्र वगळून ग्रामीण भागात मॉल्स, शॉपिंग कॉम्पलेक्स वगळून सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget