मालेगावात दोन दिवसात टेली रेडिओलॉजी कार्यान्वित होणार - आरोग्यमंत्री टोपे

नाशिक - कोरोना विषाणूमुळे नाशिकमधील मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक बाधित झाले आहेत. तसेच आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, नर्स आणि अधिकारी तसेच पोलीस यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. मालेगाव हॉटस्पॉट शहर ठरले आहे. त्यामुळे येथे विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे, त्यासाठी येत्या दोन दिवसात मालेगाव शहरातील रुग्णालयात ‘टेली रेडिओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मालेगाव शहरातील कोरोना विषाणूमुळे वाढती रुग्णसंख्या व वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी आरोग्यमंत्री टोपे यांनी नाशिकला भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे, महापौर ताहेरा शेख, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग, माजी आमदार आसिफ शेख, माजी महापौर रशिद शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
टेलीरॅडियोलॉजी म्हणजे रेडिओलॉजिकल रुग्ण प्रतिमांचे एक्स-रे, सीटी आणि एमआरआय सारख्या रेडिओलॉजिकल आणि डॉक्टरांशी अभ्यास सामायिक करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी प्रसारित करणे. न्यूमोनियासह अन्य टेस्टिंगसाठी एक्स-रे महत्त्वाचा असून त्याचा रिपोर्ट हा टेलि रेडिओलॉजीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडे जावून त्यावर योग्य उपचाराची दिशा ठरणार आहे. त्यामुळे रुग्णाला त्याचे निदान व आरोग्य यंत्रणेमार्फत देण्यात येणारे उपचार तत्काळ मिळणार आहेत. त्याचबरोबर नाशिकमध्ये ‘टेली मेडिसीनची’ व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना आवश्यक उपचाराबाबत सल्ला व उपचाराची योग्य दिशा देणार आहेत. या माध्यमातून कोविड आणि नॉन कोविड अशा सर्व रुग्णांना दिलासा मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget