सलाम महाराष्ट्र देशा....

पुरोगामी आणि सुसंस्कृत हि महाराष्ट्राची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर आणि समाजसुधारक नेत्यांचा आपल्या राज्याला मोठा वारसा लाभला आहे.मी शतशः त्यांना नमन करतो.तशी महाराष्ट्र राज्याची ओळख हि देशातच नव्हे तर जगामध्ये आहे. महाराष्ट्राच्या विविधतेतून संपूर्ण भारताचे दर्शन घडते. आज देशातील एक पुरोगामी प्रगत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेली लोकशाहीची वाटचाल आता गतिमान होत आहे.एकेकाळी पाश्चिमात्य जगतात मोठ्या प्रमाणात काम निर्माण होत असे त्यामुळे कामगारांकडे भरपूर काम होते, मात्र त्यांची पिळवणूक सुरु होती. त्यामुळे कामगारांना १२ तास १४ काम करावे लागत असे,या विरोधात कामगार एकजूट झाले आणि त्यांनी उचलला. जगभरात याचे तीव्र पडसाद उमटू लागले. अखेर कामगाराची कामाची वेळ ८ तास निश्चित करण्यात आली. यानंतर कामगारांच्या हक्कासंदर्भात दोन अंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. नंतर १ मे १८११ पासून जगभरात कामगार दिन साजरा केला जाऊ लागला.याच पार्शवभूमीवर संयुक्त महाराष्ट्राचा लढा वेगवेगळ्या स्तरावर लढला गेला. या लढ्यात कामगारांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्याच्या या लढ्यामुळे १ मे १९६० रोजी मराठी भाषकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्याच दिवशी महाराष्ट्र दिन बरोबरच कामगार दिनही मोठ्या उत्साहात साजरा केला जाऊ लागला. १ मे. ६० वर्षांपूर्वी म्हणजेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मागील ६० वर्षात महाराष्ट्र राज्याने प्रगतीची घोडदौड अशी केली आहे की आज महाराष्ट्र राज्य देशात सर्वात आघाडीवरचे राज्य आहे. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे. जागतिकीकरणाच्या धोरणामुळे शासनाच्या धोरण, नीती व दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल झाला असून, नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादन प्रक्रियेचे मालकी, प्रकार व स्वरूप बदलत असून राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांची यातून अनियंत्रित मक्तेदारी वाढत आहे. त्यामुळे कामगार व मालक यांच्यातील परस्पर संबंधांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. कामगारांपुढे ही एक चिंतनीय व आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कामगार चळवळीला पर्यायी आर्थिक नीतीचे प्रारूप तयार करून जनतेसमोर ठेवणे आवश्यक आहे. आपले मतभेद बाजूला ठेवून कामगारांच्या हक्कावरील व कामगार चळवळीवरील हल्ल्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्रित कामगार चळवळीची गरज आहे.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्यात रस्ते, परिवहन (एसटी), पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी अशा अनेक मूलभूत समस्यांवर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली. राज्यातला लहानातला लहान माणूसही आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, हा हेतू धरून राज्याने आजवरची वाटचाल केली आहे. राज्यकर्त्यांनी राज्यात विविध ठिकाणी मोठं मोठी उद्योग केंद्र उभारली आणि त्यातून सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या मिळाल्या,त्यातच पुणे – मुंबई यातून साकार झालेले संयुक्त शहर ही आपली मोठी शक्ती आहे. त्याच प्रमाणे नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद अशा ग्रामीण महाराष्ट्राकडेही पाहावे लागणार आहे.शिक्षण आणि शेती या दोन्ही स्तरांवरचा विकास आपल्याला आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राची स्पर्धा केवळ देशातच नाही तर परदेशातही असणार आहे. महाराष्ट्राला नदेवांसारखे संत आणि छत्रपती शिवाजी महाराज, शिवाय जोतिराव फुले, डॉ. आंबेडकरांसारखे राष्ट्रपुरुष याच महाराष्ट्रात होऊन गेले. स्वत:चे असे सांस्कृतिक महाराष्ट्रात सर्वच दृष्टींनी वैश्विक संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या या प्रगतीशील वाटचालीत अनेक अडचणी आल्या. भूकंप झाले, महापूर आले, दुष्काळ आले. बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले. या सर्व संकटांवर मात करीत महाराष्ट्र पुन्हा जोमाने उभा राहिला.आज माहिती तंत्रज्ञानामध्ये भारताची घोडदौडमध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. कारण महाराष्ट्राला सांस्कृतिक ओळख आहे. एक अधिष्ठान आहे. औद्योगिक, आर्थिक, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात महाराष्ट्र नेतृत्वासाठी सज्ज आहे. आज जगभरात मराठी माणूस आपल्या क्षमतांचे दर्शन घडवू लागला आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.त्यामुळे अनेक आव्हाने महाराष्ट्रासमोर असली तरी त्यातून जिद्दीने आणि विश्वासाने बाहेर पडण्याची धमक महाराष्ट्रात आहे.म्हणूनच महाराष्ट्राच्या लढवय्या परंपरेला सलाम…!

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget