लंडनला अडकलेल्या भारतीयांना मुंबईत आणले

मुंबई - केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत लंडनमध्ये अडकलेल्या ३२५ भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणले आहे. या प्रवाशांमध्ये ६५ पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. लॉकडऊनदरम्यान पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर लंडन येथून आलेले विमान दाखल झाले. हे विमान रविवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. या विमानातून आलेल्या सर्व प्रवाशांना विविध हॉटेल्समध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल 
देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लंडनमध्ये अनेक यात्रेकरी आणि विद्यार्थी अडकले होते. या सर्वांनी केंद्र सरकारकडे भारतात परत घेऊण जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन अखेर केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन’ची आखणी केली. या मिशनमार्फत लंडन येथून भारतीयांना घेऊन रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाले. हे विमान लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरुन निघाले होते. या विमानामार्फत मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या नातेवाईकांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे. 
दरम्यान, लंडन येथून आलेल्या विमानात पुणे जिल्ह्याचे एकूण ६५ प्रवासी आहेत. या सर्व प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर चार बसेसमार्फत त्यांची पुण्याकडे रवानगी करण्यात आली आहे. या प्रवाशांच्या क्वारंटाईनची व्यवस्था पुण्याच्या हॉटेल सदानंद रेजन्सी, बालेवाडी- म्हाळुंगे येथे करण्यात आली आहे. 


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget