लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा

ठाणे - पोलीस ठाण्यात विनयभंगप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी साडेबारा लाखांची मागणी करणाऱ्या ठाणे ग्रामीण पोलीस दलातील शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप सावंत यांच्यासह ओंकार पातकर, आकाश सावंत, सचिन रांजणे या खाजगी इसमांविरोधात लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.तक्रारदार यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामध्ये जामीन देण्यासाठी मदत केल्याबद्दल, त्याचबरोबर त्या गुन्ह्यातून मुक्तता करण्यासाठी आणि त्यांचे गोठवलेले बँक खाते पूर्वरत सुरू करून देण्यासाठी व इतर ही मदत करण्यासाठी तक्रारदारांकडे ५० लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती १२ लाख ५० हजार देण्याचे ठरले. याचदरम्यान तक्रारदारांनी ठाणे एसीबीत केलेल्या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ठाणे एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक नीलिमा कुलकर्णी या तपास करत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget