मुंबईत ड्युटीवरील पोलिसावर हल्ला

मुंबई - लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी कुर्ला परिसरात तैनात असलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ एप्रिलला या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला झाला होता.पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढत असल्याने राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांवरील हल्ले थांबताना दिसत नाहीत. 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल रोजी पाइप रोडवर या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथक तैनात होते. लॉकडाऊनचे पालन करण्यासंबंधी ते नागरिकांना आवाहन करत होते. पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना, आरोपी रिझवान जुबेर मेमन टुंडा याने त्यांच्याशी हुज्जत घातली. 
मी एनआयएमध्ये काम करत असून, पोलीस अधिकाऱ्यांनी परिसरातील दुकाने बंद केली तर मी तुम्हाला नोकरीवरून हटवू शकतो, अशी धमकीही त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी गर्दी जमा होऊ लागली. त्यानंतर रिझवान दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरला आणि त्याने पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यानंतर इतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांना पाहून रिझवान तेथून पसार झाला.आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यायांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget