मुंबईसह इतर शहरातून गावी जाण्यासाठी ११ मेपासून मोफत एसटी सेवा सुरू होणार

मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू असून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. आता सरकारकडून गावी जाण्यासाठी एसटीसेवा सुरू करण्यात येणार आहे. ११ मेपासून ही सेवा सुरू केली जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हा प्रवास मोफत असणार आहे.मुंबई पुणे येथे अडकलेल्या लोकांना गावी जाण्यासाठी सोमवार ११ मेपासून एसटी सेवा सुरू होणार आहे. मुंबई, पुण्यासह विविध शहरात, गावात अडकलेल्या लोकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे.गावी जाण्याचा हा संपूर्ण प्रवास हा मोफत असणार आहे. 
२२ जणांचे ग्रुप बुकिंग किंवा वैयक्तिक बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी २२ जणांची यादी सादर करून प्रवासाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच वैयक्तिक व्यक्ती किंवा कुटुंबाला जाण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे.शहरी भागात ही परवानगी पोलीसांकडून दिली जाईल तर ग्रामीण भागात ही परवानगी तहसिलदार कार्यालयाकडून दिली जाईल.२२ जणांच्या ग्रुपला परवानगी मिळाली की सदर परवानगी पत्र विभागीय नियंत्रकाकडे सादर करून बसची मागणी करायची आहे. ही बस तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत जाईल. 
वैयक्तिक प्रवाशांनी MSRDC च्या पोर्टलवर जाऊन बुकिंग करायचं आहे. बुकिंग करताना परवानगी पत्र अपलोड करायचे आहे. एसटी बस पहिल्या स्टॉपला सुरू होऊन थेट शेवटचा स्टॉपला थांबेल. लांब पल्ल्याच्या बसेस प्रसाधनगृहासाठी एसटीच्या डेपोतच थांबणार आहे. त्यामुळे प्रवाशांना खाण्या-पिण्याचे साहित्य सोबत न्यावे लागणार आहे.प्रवाशांना मास्क बंधनकार, सॅनिटायझर वापरणे बंधनकार आहे. एका सीटवर एकच प्रवाशी बसण्यास परवानगी, झिकझिॅक पद्धतीने प्रवाशी बसणार
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget