मी विधानपरिषदेचे तिकीट मागितले नव्हते - बावनकुळे

नागपूर - भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले. पक्षाने एकाच घरात किती जणांना उमेदवारी द्यायची, असा सवालही उपस्थित केला. त्याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांनीही उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगितले. त्यांनीही दु:ख व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. मी विधानपरिषदेचे तिकीट मागितली नव्हते. त्यामुळे भाजपमध्ये आलबेल असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान,काल वृत्तवाहिनीवर चंद्रकांतदादांनी आपली भूमिका मांडताना बावनकुळे यांना तिकीट मिळाले नसल्याबाबत दुःख व्यक्त केले. मला वाटतं पक्षाची भूमिका जो कार्यकर्ता जिथे उपयुक्त आहे, त्यानुसार ठरली असावी. मला आता महाराष्ट्राच्या कोरोनाबाबत कामाकरिता अध्यक्ष नेमले आहे. मी पक्षाचे काम करतोय. विधानसभा निवडणुकीत मला पूर्व विदर्भातील ३२ जागांची जबाबदारी दिली होती. मी-विधानपरिषदेचे तिकीट मागितली नव्हते, असे म्हटले आहे.
मला असे वाटतं की त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरुन असे चित्र दिसत आहे की आता जुन्या लोकांना तिकीट द्यायचे नाही. नवीन कार्यकर्त्याला द्यायचे. मी नाव पाठवले नाही आणि तिकीट मागितले नव्हते. पक्षाने माझ्या नावाचा विचार केला त्याबाबत धन्यवाद, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मौन सोडले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget