मुंबईत पुन्हा एका पोलिसाचा 'कोरोना'मुळे बळी

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाचं नियंत्रण करण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह आता पोलीस कर्मचारी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत. मुंबईत कोरोना संसर्गामुळे आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ते मुंबईतील शिवडी पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते.
दिवसेंदिवस मुंबई पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत चार, पुणे एक आणि सोलापुरातील एक असा समावेश आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यापूर्वी कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच ‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना ५० लाखांचे कवच मिळणार असल्याची घोषणा केली होती.
कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलीस कुटुंबियांना 65 ते 70 लाखांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे कुटुंबातील प्रत्येकी एका सदस्याला शासकीय नोकरी मिळेल, असेही मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget