लॉकडाऊनमध्येही सलमान खान करतोय जिममध्ये वर्कआऊट

मुंबई - कोरोना व्हायरस सध्या देशभरात थैमान घातलं आहे. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींसोबत बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा लॉकडाऊनचं काटेकोर पालन करताना दिसत आहे. नेहमीच फिटनेससाठी जिममध्ये जाणाऱ्या या सेलिब्रेटींची जिम मात्र या लॉकडाऊनमुळे बंद पडली आहे. त्यामुळे काही सेलिब्रेटी घरच्या घरी व्यायाम करत आहेत. मात्र सलमान खान मात्र लॉकडाऊनमध्येही व्यायाम करताना दिसत आहे. त्याचा एक फोटो अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे जो सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे. 
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात सलमान खान जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सलमानची पिळदार बॉडी पाहायला मिळत आहे. यावरुन लक्षात येत की सलमान लॉकडाऊनमध्ये त्याचा सर्वाधिक वेळ घालवत आहे. अर्थात जिमसाठी सलमानला कुठे जाण्याची गरज नाही त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर सुसज्ज अशी जिम आहे. 
सलमानचा हा फोटो शेअर करताना जॅकलीनने लिहिलं, गिफ्ट की कठोर मेहनत. मला वाटते तो प्रत्येक दिवशी त्या गोष्टीचे आभार व्यक्त करत असतो. तो त्याचा सन्मान करतो जे त्याला देवाने दिले आहे. असे बसेच काही आहे सांगण्यासारखं पण तुम्ही सुरक्षित राहा. सलमानचा हा फोटो त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget