पुण्यातील ससून रुग्णालयात प्लाज्मा थेरेपी यशस्वी

पुणे - पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाज्मा थेरपी यशस्वी ठरली आहे. ६ मे रोजी नायडू रुग्णालयातून कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला. या रुग्णाच्या शरीरातील प्लाज्मा रक्तातील १ घटक ससून रुग्णालयात दान देऊन गंभीर अवस्थेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचे प्राण वाचवण्यात आले. कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर १ महिन्यात त्याच्या रक्तामध्ये कोरोना विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज होतात.प्लाज्मा देण्याची प्रक्रिया ससून रुग्णालयात मागील आठवड्यात यशस्वीरित्या पार पडली. १५ व्या दिवशी या रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला कोविड वार्डमधून हलविण्यात आले आहे. प्लाज्मा थेरपी केलेल्या रुग्णाला उच्च रक्तदाब, हायपोथाराईडीझम आणि अतिस्थूलपणा हे आजार होते. कोविड १९ च्या आजारात असे रुग्ण बऱ्याचदा दगावतात. मात्र, या व्यक्तीला वेळीच (१० आणि ११ मे रोजी) प्लाज्मा (२०० एमएल प्रतिदिन) दिल्याने रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. लवकरच या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे ससून रुग्णालयातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
२० मे रोजी दुसऱ्या रुग्णासाठी प्लाज्मा थेरपी सुरू केली असून, रुग्णाची प्रकृती सुधारत आहे. कोव्हीड १९ आजारातून बरा झालेला आणि २८ दिवसांपेक्षा जास्त लक्षणे नसलेला रुग्ण प्लाज्माचे दान करू शकतो. फक्त १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेला पुरुष किंवा मुलबाळ नसलेली महिला प्लाज्माचे दान करून रुग्णाचे प्राण वाचविण्यास मदत करू शकतात,असे सासूनचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget