कतरिनाने माझ्याकडे सलमानची तक्रार केली होती - शोएब अख्तरचा दावा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. परंतु यावेळी कतरिना चक्क पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब अख्तरमुळे चर्चेत आहे. कतरिनाने माझ्याकडे येउन सलमानबद्दल तक्रार केली होती. असा दावा शोएबने केला होता.
शोएब अख्तरचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शोएब म्हणतोय, “बंगळूरुमध्ये असताना कतरिना व माझी भेट झाली होती. त्यावेळी कतरिना मला म्हणाली सलमान आणि तुला न्यूजच्या बाहेर ठेवणे अशक्य आहे. तुम्ही दोघे नेहमीच कॉन्ट्रोवर्सीमध्ये असता. यानंतर त्याने शाहरुख खान आणि इतर बॉलिवूड कलाकारांचे किस्से सांगितले.
हा २००८चा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी खेळाडू रमिज राजा यांनी जिओ टीव्हीसाठी शोएब अख्तरची मुलाखत घेतली होती. त्यावेळी बॉलिवूड कलाकारांचे किस्से सांगत असताना शोएबने हा कतरिना सलमानचा किस्सा सांगितला होता. त्यावेळी सलमान खान कतरिनाला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. परंतु काही कालावधीनंतर कतरिनाचे नाव रणबीर कपूरसोबत जोडले जाउ लागले. परिणामी सलमानसोबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget