कोरोनाविरोधात १३० औषधांचे ट्रायल सुरु

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाव्हायरसचे ५३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. ३ लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी असे औषध नाही. मात्र इतर आजारांवरील औषधांचे ट्रायल कोरोनाविरोधात केले जात आहे. तब्बल १३० औषधांचे ट्रायल सुरू असून त्यापैकी दोन औषधं सर्वात प्रभावी असल्याची माहिती भारतातील तज्ज्ञांनी दिली आहे.
अमेरिकेतील थिंक टँक मिल्कन इन्स्टिट्युटच्या ट्रॅकरनुसार कोरोनाव्हायसवर उपचारासाठी १३० पेक्षा जास्त औषधांचे परीक्षण सुरू आहे. काही औषधांमध्ये व्हायरसला रोखण्याची क्षमता असू शकते. तर काही औषधं रोगप्रतिकारक शक्ती अतिसक्रिय होण्यापासून रोखू शकतात.
सीएसआयआरचे राम विश्वकर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, कोरोनाव्हायरसविरोधात सध्या एक प्रभावी मार्ग आहे तो म्हणजे इतर आजारांवर उपचारासाठी मान्यता देण्यात आलेल्या औषधांचा कोरोनाव्हायरसवरील उपचारांसाठी प्रयोग. याचे एक उदाहरण म्हणजे रेमिडेसिवीर. या औषधामुळे लोकं लवकर बरे होण्यास मदत होत आहे. या औषधामुळे गंभीर रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हे औषध जीवनरक्षक ठरू शकते. फेविपिरावीर औषधदेखील आशादायक आहे. सध्या तरी कोरोनाव्हायरसविरोधात नवीन औषध तयार करण्याइतपत पुरेसा वेळ आपल्याकडे नाही. नवीन औषध विकसित करण्यासाठी ५ ते १० वर्षे लागू शकतात. त्यामुळे आपण सध्या जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करत आहोत. या औषधांचे क्लिनिकल ट्रायल घेऊन ही औषधं प्रभावी आहेत की नाहीत हे तपासत आहोत.एचआयव्ही आणि व्हायरल इन्फेक्शनवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांचा कोरोनाव्हायरसविरोधात वापर करून पाहता येऊ शकतो आणि जर ही औषधं प्रभावी ठरली तर औषध नियामक संस्थांची मान्यता घेऊन ही औषधं कोरोनाव्हायरसविरोधात उपचार म्हणून वापरता येऊ शकतात, असे विश्वकर्मा म्हणाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget