सीकेपी बँकेचा परवाना रद्द ; खातेदारांना फटका

मुंबई - सीकेपी सहकारी बँकेच्या ठेवीदारांना रिझर्व्ह बँकेकडून मोठा धक्का बसला आहे. बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. यामुळे बँकेतील ११ हजार ५०० ठेवीदार व १.२० लाख खातेदारांना मोठा फटका बसला आहे.एप्रिल २०१४ पासून ठेवी स्वीकारण्याला आणि बँकेच्या नवीन कर्ज वितरणावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. गेल्या दोन वर्षांपासून ठेवीदारांचा एक गट बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील होता. बँकेच्या फेरउभारीसाठी सरकारने मदत करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात ठेवीदारांकडून याचिकाही दाखल करण्यात आलेली आहे. 
मराठी मध्यमवगीर्यांची बँक म्हणून प्रचलित असलेल्या सीकेपी बँकेच्या मुंबई आणि ठाण्यात आठ शाखा आणि सुमारे सव्वा लाख खातेदार आहेत. संचालक मंडळातील काही सदस्यांच्या मनमानी कारभारामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या बँकेला वाचविण्याच्या प्रश्नावर विधिमंडळात चर्चा आणि राजकीय वतुर्ळात उच्चस्तरावरून प्रयत्न सुरू होते. तथापि पुनरुज्जीवनासाठी पुरेशी संधी व वेळ देऊनही त्याला आलेले अपयश आणि उत्तरोत्तर खालावत चाललेली बँकेची आर्थिक स्थिती पाहता, बँकिंग नियमन कायद्याच्या कलम २२ व ५६ अन्वये बँक म्हणून व्यवसाय करण्याचा परवाना रद्दबातल करणारा आदेश रिझर्व्ह बँकेने काढला. उल्लेखनीय म्हणजे, ३१ मार्च २०२० रोजी बँकेवरील निर्बंध आणखी दोन महिन्यांनी म्हणजे ३१ मे २०२० पर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला होता. 
रिझर्व्ह बँकेने काढलेल्या आदेशात, यापूर्वी ११ जून २०१५, २३ आॅगस्ट २०१७ आणि १४ मार्च २०१८ असे तीनदा सीकेपी बँकेवर परवाना रद्दबातल करणारी कारवाई का केली जाऊ नये म्हणून ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली होती, असे सांगितले. शिवाय, ‘टॅफकब’च्या सूचनेनुसार, बँकेच्या पुनरुज्जीवनाचा कालबद्ध आणि ठोस आराखडा सादर करण्यास अनुमती दिली गेली. मात्र आराखड्यात नमूद उद्दिष्टानुरूप, कर्जवसुली आणि भागभांडवल उभे करण्यास सीकेपी बँक पूर्ण अपयशी ठरल्याचे दिसून आले, असे म्हटले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget