कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळा ; उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई - देशात १७ मी पर्यंत लॉकडाऊन आहे आणि पुढे लॉकडाउनच चौथा टप्पाही येणार आहे. चौथ्या टप्यात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थिती राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत असे पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणावर मजुरांचे ये-जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल त्यामुळे संसर्ग वाढणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील, याची दक्षता प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
१७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्यांनी आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. लवकरच पावसाळा येत असून त्यातही साथीचे व इतर रोग येतात. कोरोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्सना ते नियमितरित्या आपल्या सेवा सुरु करतील हे पाहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहोत. आता मे महिन्यात कोरोनाची मोठी संख्या पहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि कोरोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एकीकडे आरोग्य आणीबाणी आहे आणि दुसरीकडे आर्थिक आणीबाणी निर्माण होणे ही तारेवरची कसरत आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायही सुरु करावे लागत आहेत. मात्र ज्या क्षेत्रात ते सुरु होत आहेत तिथे अधिक काळजी घ्यावी लागेल. ग्रीन झोन्समध्ये आपण जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरु केली आहे पण तिथेही कटाक्षाने काळजी घ्या, अशी सूचना करण्यात आली.राजधानी एक्स्प्रेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. दिल्लीहून मुंबईला रेल्वे सुरु होत आहे. मात्र आपण एकीकडे मजुरांची व्यवस्थित नावे नोंदवून दुसºया राज्यात पाठवतो आहोत, मग एक्स्प्रेसमधून कोण प्रवासी येत आहेत त्याविषयी अगोदरच सर्व माहिती महाराष्ट्राला मिळावी म्हणजे काळजी घेता येईल असे आम्ही रेल्वेला कळविल्याचे, उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget