कोरोनाग्रस्त कैद्यांना माहूलमध्ये ठेवण्यास स्थानिकांचा विरोध

मुंबई - आर्थर रोड कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांना माहूलमध्ये ठेवण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. आर्थर रोड कारागृहातील ७२ कैद्यांना माहूल येथील इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवण्यावर विचार सुरू आहे.मात्र स्थानिकांचा त्याला विरोध आहे. प्रदूषित माहूलमध्ये या कैद्यांना आणल्यास स्थानिकांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. तसेच माहूलमधील वातावरणात प्रदूषित घटकांचे प्रमाण अधिक आहे. त्याचाही या कोरोनाबाधितांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांचा आजार बळावण्याची शक्यता रहिवासी व्यक्त करत आहेत.दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांना माहूलमध्ये आणू नये, या मागणीसाठी शेकडो रहिवासी शनिवारी रस्त्यावर उतरले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget