पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी एक हजार कोटींची मदत

कोलकाता - पश्चिम बंगाल आणि ओदिशा येथे अम्फान चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे पाहणी दौरा केला.त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.त्याशिवाय, अम्फान चक्रीवादळामुळे जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केंद्र सरकार करेल, असेही पंतप्रधानांनी जाहीर केले.
पीएम नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. त्यांच्यामते, नुकसान १ लाख कोटीचे झाले आहे आणि पॅकेज फक्त १ हजार कोटीचे देण्यात येत आहे.अम्फान चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत या चक्रीवादळामुळे ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोटी रुपयांचे आतापर्यंत नुकसान झाले आहे.
पीएम मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यासोबत अम्फान चक्रीवादळाने प्रभावित ठिकाणांची हवाई पाहणी केली. या दरम्यान त्यांच्यासोबत राज्यपाल जगदीप धनखडही उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget