पाकच्या हाय कमिशन अधिकाऱ्यांनी हेरगिरी करून ISIला माहिती पुरवल्याचा आरोप

नवी दिल्ली - हेरगिरीच्या आरोपाखाली पाकच्या उच्चायुक्ता अधिकाऱ्यांना पकडल्यानंतर इमरान खान यांचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानने या प्रकरणावर आक्षेप नोंदविला आहे. एवढेच नाही तर हाय कमिशनच्या दोन अधिकाऱ्यांवरील हेरगिरीचे आरोप पाकिस्तानने फेटाळले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांना पर्सोना-नॉन ग्रेटा घोषित केल्यानंतर पाकने याचा निषेध केला आहे. पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे की, नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या दोन अधिकाऱ्यांना पर्सोना-नॉन ग्रेटा घोषित करणे ही भारताची पूर्वनियोजित कारवाई आहे. हा पाकिस्तानची बदनामी करण्याचा एक भाग आहे.
पाकिस्तानने म्हटले आहे की, नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील दोन अधिकाऱ्यांना ३१ मे २०२० रोजी खोटे व निराधार आरोपात भारतीय अधिकाऱ्यांनी पकडले. दरम्यान, उच्चायोगानं हस्तक्षेप केल्यामुळे त्यांची सुटका झाली. पाकिस्तानचं म्हणणे आहे की त्यांच्या अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करण्यात आले आहेत.आम्ही भारताने केलेले आरोप फेटाळतो. दिल्लीत पाकिस्तान उच्चायोगाने नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदा आणि नियमांचे पालन केले आहे.
भारताने दोघांनाही पर्सोना-नॉन ग्रेटा म्हणून घोषित केले आहे. दोघांनाही २४ तासांत भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात, पाकिस्तानच्या उप-राजदूतांनाही आक्षेप घेतला आहे. ज्यात पाकिस्तानच्या राजनयिक मोहिमेतील कोणताही सदस्य भारतविरोधी कार्यात सामील होऊ नये याची काळजी घेतली गेल्याचेही सांगण्यात आले आहे. दिल्लीतील करोलबाग परिसरातून अबीद हुसेन आणि ताहिर हुसेन हे हाय कमिशनच्या व्हिसा विभागात कार्यरत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की दोघांनाही भारतीय कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी पकडले. एजन्सी अनेक महिन्यांपासून या दोन अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवून होती. असे सांगितले जात आहे की हे दोघे भारतीय जवानांवर लक्ष ठेवून होते आणि त्यांची माहिती ISIला पुरवत होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget