लॉकडाउनमध्येही अमिताभ बच्चनसोबत KBC खेळण्याची संधी

मुंबई - सोनी टीव्हीवरील लोकप्रिय शो कौन बनेगा करोडपती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनचं वातावरण असतानाही बिग बी अमिताभ बच्चन प्रेक्षकांसाठी KBC चा १२ वा सीझन घेऊन येत आहेत. या नव्या सीझनचं रजिस्ट्रेशन येत्या ९ मे पासून सुरू होणार आहे. KBC च्या इतिहासात हे पहिल्यांदा होत आहे की, रजिस्ट्रेशन ते स्पर्धकांची निवड ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. यावेळी शोची टॅगलाइन सुद्धा नेहमीपेक्षा खूपच वेगळी आहे. प्रेक्षकांना लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसच्या नकारात्मकतेमधून खंबीरपणे बाहेर पडण्याची प्रेरणा देते. 'हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं' अशी नव्या सीझनची टॅगलाइन आहे. 
KBC12 ची रजिस्ट्रेशन प्रक्रिया २२ मे पर्यंत असणार आहे. यात अमिताभ बच्चन रोज रात्री ९ वाजता सोनी चॅनेलवर एक प्रश्न विचारतील या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला SMS किंवा सोनी लिव या अॅपवरुन द्यायचा आहे. प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्यांना यातून निवडले जाईल आणि त्यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्यात येईल. प्रोसेसच्या तिसऱ्या टप्प्यात निवडलेल्या स्पर्धकांची एक सामान्य ज्ञानाची परिक्षा घेतली जाईल ज्याचा व्हिडीओ बनवून स्पर्धकांना तो सोनी लिव अॅपवरुन पाठवायचा आहे. त्यानंतर या स्पर्धकांची व्हिडीओ कॉलिंगद्वारे मुलाखत घेतली जाईल.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget