डॉक्टर हर्षवर्धन यांची WHO च्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली - कोरोनाच्या लढाईत भारताने केलेल्या कामाचे कौतुक जागतिक स्तरावर केले जात आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. हर्षवर्धन २२ मे रोजी पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते.हर्षवर्धन यांची जपानचे डॉक्टर हिरोकी नकाटानी यांच्या जागी नियुक्ती करण्यात येणार आहे. सध्या ३४ सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत.एका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे मंगळवारी १९४ देशांच्या जागतिक आरोग्य सभेमध्ये भारताला कार्यकारी मंडळात नियुक्त कऱण्याबाबतच्या प्रस्तावावर सह्या झाल्या. जागतिक आरोग्य संघटनेचे दक्षिण पूर्व आशिया समुहाने गेल्या वर्षी सर्वानुमते निर्णय घेतला होता की, भारताला तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर निवडले जावे.
हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत होईल. क्षेत्रीय गटांमध्ये अध्यक्ष पद एक वर्षासाठी दिले जाते. गेल्या वर्षी हे ठरवण्यात आले होते. येत्या शुक्रवारपासून यातील पहिले वर्ष सुरू होणार असून यासाठी भारताचा प्रतिनिधी कार्यकारी बोर्डाचा अध्यक्ष असणार आहे.पूर्णकाळासाठी नसून त्यांना कार्यकारी बोर्डच्या बैठकींमध्ये अध्यक्षता करण्याची आवश्यकता असेल. बोर्डा वर्षातून किमान दोन बैठका घेते. मुख्य बैठक जानेवारीमध्ये होते. आरोग्य सभेनंतर मे महिन्यात आणखी एक लहान बैठक होते. कार्यकारी बोर्डाच्या अध्यक्षांचे मुख्य काम आरोग्य सभेचे निर्णय आणि निती तयार करण्यासाठी सल्ला देणे असते.
सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ७३ व्या जागतिक आरोग्य सभेत हर्षवर्धन यांनी सांगितले होते की, कोरोना साथीचा सामना करण्यासाठी वेळेत सर्व आवश्यक ती पावले उचलली. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी चांगली कामगिरी केली असून पुढच्या काही महिन्यात आणखी चांगले करू असा विश्वासही दर्शवला होता.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget