बीएसएनलच्या 4 जी सुविधेसाठी चिनी उपकरणांवर निर्बंध

नवी दिल्ली -  दुरसंचार विभागाने भारतीय संचार निगम लिमीटेडच्या (बीएसएनएल) 4 जी सुविधा अद्ययावत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी साहित्याचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीनमध्ये गलवान (लडाख प्रदेश) खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये भारताचे २० जवान हुतात्मा झाल्यानंतर भारताने चीनची आर्थिक कोंडी करण्याकडे हे पहिले पाऊल टाकले आहे. तसेच देशाच्या सुरक्षेतही चीनकडून छेडछाड करण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दुरसंचार विभागाने 4 जी संबंधीचे सर्व निविदेवर पुन्हा काम करण्याच निर्णय घेतला आहे. भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्या सध्या ह्युवाई या कंपनीसोबत काम करत आहेत, तर जेडटीई कंपनी बीएसएनएलसोबत काम करत आहे.२०१२ ला अमेरिकी संसदेच्या सदस्यांच्या एका समितीने एक अहवाल जाहीर केला होता. ज्यामध्ये चिनी कंपन्यांनी बनवेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यामधून दुसऱ्यावर नजर ठेवण्यात येत असल्याचे अहवालात सांगितले होते. त्यावेळीच त्यांनी त्यांच्या देशाला इशारा दिला की, चिनी कंपन्यांसोबत काम करण्याच्या निर्णयावर फेरविचार व्हावा. त्यानंतर चीनकडून या गोष्टीचे खंडण करण्यात आले होते.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget