मनोज तिवारीं ला पदावरून हटवले, आदेश गुप्तांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली - दिल्लीचे खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांना मोठा झटका बसला आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मनोज तिवारी यांना पदावरून काढून आदेश गुप्ता यांची दिल्ली प्रदेशाध्यक्ष बनवले आहे.मनोज तिवारी यांना कोणत्या कारणाने पदावरून काढण्यात आले त्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. दिल्ली निवडणूकीत पराभव झाल्यामुळे तिवारींना नारळ देण्यात आला आहे. 
मनोज तिवारी बाहेरचे असल्यामुळे त्यांना स्थानिक नेत्यांचा विरोध होता.काही दिवसांपूर्वी जेवणाच्या मुद्द्यावरून तिवारी वादग्रस्त बनले होते.आदेश गुप्ता यांचे व्यापाऱ्यांमध्ये चांगले संबंध आहेत.भाजपने मूळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदेश गुप्ता यांचे नाव घोषित करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गुप्ता एमसीडीमध्ये महापौर राहीले आहेत.मनोज तिवारी यांना पदावरून काढून आदेश गुप्ता यांची निवड झाली आहे. आदेश गुप्ता एक वर्ष अगोदर उत्तर एमसीडीचे महापौर होते. भाजपकडून व्यापाऱ्यांना खूष करण्यासाठी नवा चेहरा समोर आणला आहे. 
मनोज तिवारी यांना कार्यकर्त्यांसोबत सोमवारी लॉकडाऊनमध्ये नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपामुळे अटक करण्यात आली आहे. दिल्लीत कोविड-१९ संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकार फेल ठरले याविरोधात निदर्शने केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget