रत्नागिरीला चक्रीवादळाचा तडाखा, जिल्ह्यात मुसळधार पाऊस

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून, मुसळधार पाऊस सुरु आहे. किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर भरकटलेलं जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या समुद्रातील लाटांमध्ये अडकले आहे. जहालाजा मिरकरवाडा बंदरात नेण्यात अपयश आले आहे. जहाजावर काही खलासी असण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.खारेघाट रोड येथील काशी विषश्वेवर मंदिराच्या बाजूला वादळामुळे झाड मध्येच तुटले. गुहागर, दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीत हा मुसळधार पाऊस पडत आहे. हा निसर्ग चक्रीवादळाचा परिमाण असून वाऱ्याचा वेगही वाढलाय. ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. संगमेश्वरमधील देवरुखमध्ये देखील पाऊस आणि वाऱ्याने जोर धरला आहे.निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून ५० किमी दूर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे. काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. तर सकाळी ६ वाजल्यापासून पावसाने जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगाने वाहत असल्याने, शहरात काही ठिकाणी वृक्ष पडले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget