चकमकीत ३ दहशतवादी ठार, चार दिवसात १२ अतिरेक्यांचा खात्मा

शोपियान - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधमा येथे भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात पुन्हा चकमक झाली. दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात ३ दहशतवादी ठार झाल्याची बातमी आहे. भारतीय सुरक्षा दलाने अजूनही संपूर्ण परिसर घेरला असून या भागात शोध मोहीम राबविली जात आहे. मुख्य म्हणजे शोपियान जिल्ह्यात चार दिवसात तीन वेगवेगळ्या चकमकीत एकूण १२ दहशतवादी ठार झाले आहेत.
माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील सुगो हेंधामा येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे सैन्य, पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम तयार केली गेली. भारतीय सैनिकांनी परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली. पकडले जाण्याच्या भीतीने घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार सुरू केला. दोन्ही बाजूंकडून गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या भागात आणखी बरेच दहशतवादी लपवल्याची माहिती लष्कराला मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय सुरक्षा दलाने काश्मीरमधील दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. याआधी शोपियांच्या रेबन गावात सैनिकांनी हिज्बुलच्या टॉप कमांडरसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. दुसर्‍याच दिवशी शोपियानच्या पिंजुरा भागात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget