मुंबई क्षेत्रात प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही

मुंबई - मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) येणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारने अंतर्गत प्रवासाची परवानगी दिली आहे. म्हणजेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली भागातील रहिवाशांना एमएमआर भागात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही.गुरुवारी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारने एमएमआरमधील नागरिकांच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिली. तर राज्यात इतरत्र आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाचे नियम कायम राहतील, असेही यात नमूद केले आहे.जवळपास ५६ हजार रुग्णसंख्या असलेल्या मुंबई महानगर प्रदेशाला ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मोडतो.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget