‘उठ मराठ्या लाग कामाला’...

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आपल्या देशात अक्षरशः सामान्य नागरिकांना हैराण करून सोडले आहे.विशेष करून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रुग्ण सापडताहेत म्हणून सरकारची चिंता वाढली आहे.राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करिन असे बोलले आहेत.आता आपल्याला जास्त वेळ डोळे बंद करून बसायचे नाही हे मराठ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.जर आपण आज सावरलो नाहीतर कधी अशी संधी पुन्हा येणार नाही.मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये पर राज्यातून आलेले मजूर कोरोनाच्या भीतीने आपापल्या राज्यात परतले आहे.उत्तर प्रदेश,बिहार,पश्चिम बंगाल,अंधताप्रदेश,राजस्थान मधून मुंबईत आलेले मजूर अशा संकटसमयी मुंबईला सोडून गेले आहेत.याच मुंबईत ते जीवाची मुंबई करण्यासाठी आपल्या राज्यातून इथे येऊन काम करून पैसे मात्र आपल्या गावी पाठवत होते,कारण त्यांना फक्त मुंबईतून पैसे कमवायचा होता,आणि गावचेच ओढ त्यामुळे मराठी माणसांनी काहीतरी त्यांच्याकडून शिकायला हवे.मुंबई हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कान मनाला जातो.म्हणूनच परदेशातूनही या मुंबईत लॉक पैसे कमवायला येतात.आज आपल्या राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत आहे.म्हणून आपण घाबरून जाऊ नका.कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी सरकार कडून सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.कारण कोरोना अजून काही वर्ष आपल्या सोबत राहणार आहे,म्हणून आपण काय घरी बसायचे का? तर अजिबात नाही.'घरी रहा सुरक्षित रहा' हा संदेश वेडेपणाच आहे आणि हे वास्तव आहे ते आपल्याला मान्य करावेच लागेल.नागरिकांना आता कामाला जायला लागणारच आहे.त्यासाठी सामाजिक अंतराचे भान ठेऊन आपण काम करू शकतो.म्हणूनच आपण आपली जबाबदारी घेत मिळेल ते काम करा.आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहित नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे.करोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन केल्याने गेले काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावे लागेल. कारण गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठायला लागलाय. आपण असेच घरात बसून राहिलो तर या संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणेही आपल्याला कठीण होईल.म्हणून कोरोनाच्या भितीला झुगारून देऊन काम करण्याची इच्छा शक्ती बाळगा.समाजात वावरताना आपले सार्वजनिक जीवनातील वर्तन, वावर हे अधिक जबाबदारीने ठेवावे लागणार आहे. आपण घाबरून घरात बसलो तर आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू एवढे मात्र नक्की, म्हणूनच म्हणतोय कि ‘उठ मराठ्या ( मराठ्या म्हणजे महाराष्ट्रातील युवक असा आहे) लाग कामाला’.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget