निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करा, काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई - महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक मुंबईमध्ये पार पडली. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे, अशी मागणी या बैठकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असेही थोरात म्हणाले. 
राज्याचे काही प्रश्न घेऊन एकत्र चर्चा केली. चक्रीवादळ झाले त्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवर गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांसाठीही आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करणे अपेक्षित आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. 
महाविकासआघाडीचे सरकार चालवताना निर्णय घेताना आम्हाला विचारात घेत नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येणारे निर्णय तिन्ही पक्षांची चर्चा करून घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसते, त्यामुळे निर्णयांमध्ये सहभागी नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्षपदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती काँग्रेसकडे आहेत. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget