निसर्ग’मुळे रायगडमध्ये ‘५ लाखाहून अधिक घरांचे नुकसान - आदिती तटकरे

अलिबाग - निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे रायगड जिल्ह्यातील ५ लाखहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. रस्ता वाहतुक सुरळीत करण्यात यश आले असले तरी ग्रामिण भागातील विद्यूत पुरवठा पुर्ववत करण्यासाठी किमान सात ते आठ दिवस लागतील असा अंदाज रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
या चक्रीवादळाचा जिल्ह्यातील १२ तालुकांना तडखा बसला आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ५ लाख हून अधिक घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. तर ५ हजारहून अधिक हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे खंडीत झालेली रस्ते वाहतूक पुर्ववत करण्यात यश आले आहे. मात्र विद्यूत पुरवठा आणि दुरसंचार यंत्रणा खंडीत आहे. शहरी भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र ग्रामिण भागातील वीज पुरवठा पुर्ववत करण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. राज्याच्या उर्जा विभागाकडे त्यासाठी मागणी करण्यात आली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.श्रीवर्धन, माणगाव, रोहा, मुरुड, अलिबाग तालुक्यांना वादळाचा मोठा फटका बसला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget