बँक कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास देण्याची संघटनांची मागणी

मुंबई - सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील लोकल सेवा सुरू झाली. पालिका, पोलिस, बेस्ट अशा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण, अत्यावश्यक असलेल्या बँक, पोस्ट, प्रसारमाध्यम आदी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना मात्र सोमवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेचा प्रवास नाकारण्यात आला. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बँक संघटनांकडून होत आहे.
महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाने राज्य सरकारला पत्र लिहून याबाबत मागणी केली आहे. ‘बँक कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी द्यावी, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचता येईल. तसेच यामुळे पूर्ण क्षमतेने बँक सेवा सुरू ठेवता येईल’ अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. पण अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश नसल्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास नाकारण्यात आला. लॉकडाउनदरम्यान बँकांनी अखंडित सेवा देण्याची अपेक्षा सरकारकडून केली जाते. पण लोकल सेवा वापरताना बँक कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांच्या यादीत विचार होत नाही, याचे वाईट वाटते, असे युनियन फोरम ऑफ बँक युनियनचे (UFBU)महाराष्ट्र संयोजक देवीदास तुजापूरकर म्हणाले. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget