कारवाईच्या इशाऱ्यानंतर रुग्णालयांनी दिला मृत्यूंचा आकडा

मुंबई - मुंबई महानगरपालिकेवर कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा लपवण्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर पालिका आयुक्तांनी सरकारकडे ८६२ रुग्णांची नोंद केली. त्यानंतर पालिका आयुक्तांनी रुग्णालयांना मृतांची नोंद करायला शेवटची संधी देत साथ नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर रुग्णालयांनी मागील काही दिवसात नोंद न झालेल्या २४० मृत्यूंची नोंद गेल्या दोन दिवसात केली आहे.मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेने मृतांची आकडेवारी लपवल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर राज्य सरकारने सर्व पालिका आणि जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून आपल्या हद्दीतील मृतांची नोंद करण्याचे राहिले असल्यास त्याची नोंद करावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने ८६२ मृतांची नोंद केली आहे. पालिकेने आकडेवारी लपवलेली नाही, प्रलंबित असलेल्या रिपोर्टच्या नोंदी पालिकेकडे उशिराने आल्या, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने दिले.
कोरोना‌ या संसर्गजन्य आजाराची बाधा होऊन दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे ४८ तासांच्या आत कळविणे बंधनकारक असल्याचे आदेश ८ जून रोजी निर्गमित करण्यात आले होते. अद्यापही कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती निर्धारित वेळेत कळविलेली नसल्यास संबंधित रुग्णालयांना महापालिकेद्वारे शेवटची संधी देण्यात येत आहे. यानुसार मृत्यूनंतर ४८ तास उलटून गेलेल्या कोविडबाधित मृत्यूंची माहिती महापालिकेकडे कळविण्यासाठी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अशा रुग्णालयांना आता शेवटची संधी दिली होती.त्यानुसार एखाद्या रुग्णालयाच्या स्तरावर अशी माहिती प्रलंबित असल्यास त्यांनी सदर माहिती ४८ तासात बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे द्यायची आहे. शेवटची संधी देऊनही कोविडबाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेकडे न कळविल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' अन्वये कठोर कारवाई करण्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला होता.पालिका आयुक्तांच्या इशाऱ्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडे १९ व २० जून या दोन दिवसात एकूण २४० मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget