अमित शाह यांची ऑनलाइन सभा ;कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार

नवी दिल्ली - बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज या पार्श्वभूमीवर ७२ हजार बुथच्या माध्यमातून व्हर्च्युअल रॅलीद्वारे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.
जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. देशावर करोनाचे संकट ओढावलेले असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी पक्षाकडून करण्यात आलेला आहे. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget