मनिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर सीबीआयचे छापे

इंम्फाळ - सरकारी निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि मनिपूरचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण विभागाचे(सीबीआय) पथक चौकशी करण्यासाठी दाखल झाले आहे. सीबीआयचे संयुक्त संचालक एन. एम. सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील पथक काल(मंगळवार) मनिपूरमध्ये तपासासाठी आले. सिंह यांच्यासह इतरही नेत्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपचे सरकार अडचणीत आले असतानाच सीबीआयने काँग्रेस नेत्यांची चौकशी सुरु केली आहे. मागील बुधवारी (१७ जून) नॅशनल पिपल्स पार्टीच्या चार मंत्र्यांसह एकूण ९ आमदारांनी राजीनामा दिला. इतर पाच जणांमध्ये तिघे आमदार भाजपचे आहेत. तर एक ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि एक आमदार अपक्ष आहे. सरकारने बहुमत गमावले असून विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नव्यानेच स्थापन झालेल्या सेक्यूलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटने केली आहे.मनिपूरमध्ये भाजपचे २१ आमदार असून नॅशनल पिपल्स पार्टी, नागा पिपल्स फ्रंट, एलजेपी, तृणमूल काँग्रेस आणि एका अपक्ष आमदाराला घेवून सत्ता स्थापन केली आहे.याचवेळी चौकशी का सुरु करण्यात आली? असे अधिकाऱ्यांना विचारले असता, या प्रकरणी तपास आधीपासूनच सुरु असून काही जणांची चौकशी करण्यात आली आहे, असे उत्तर देण्यात आले. भाजपच्या मागणीवरून मागील वर्षी २० नोव्हेंबरला सीबीआयने तपास सुरु केला होता.इबोबी सिंह यांनी २००९ ते २०१७ या काळात मनिपूर डेव्हलपमेंट सोसायटीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ५१८ कोटींपैकी ३३२ कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget