सोशल मीडियावरील ट्रोलिंगला कंटाळून सोनाक्षी सिन्हाने डीअ‍ॅक्टीव्हेट केले ट्विटर अकाऊंट

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून स्टार किडसना लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने आपले ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तुमची मन:शांती जपण्याचा सर्वात पहिला मार्ग म्हणजे नकारात्मकतेपासून दूर राहणे. सध्या ट्विटरवर ही नकारात्मकता मोठ्याप्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी ट्विटर अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सोनाक्षीने सांगितले.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील जीवघेणी स्पर्धा आणि घराणेशाहीचे राजकारण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे आलिया भट्ट, सोनम कपूर, करिना कपूर, सोनाक्षी सिन्हा यांच्यासारख्या प्रस्थापित बॉलिवूड घराण्यांमधून आलेल्या कलाकारांवर प्रचंड टीका केली जात आहे. गेल्या काही दिवसांत आलिया भट्ट आणि सोनम कपूर यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. याचा बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना मोठा फटका बसत आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget