‘बबली’चा ‘फर्स्ट लूक’,लवकरच प्रदर्शित होणार

मुंबई - कोरोना विषाणूमुळे जगभरात पसरलेल्या साथीमुळे भारतातही ‘लॉकडाऊन’ चा विळखा पडला होता. दोन-अडीच महिने घरीच बसून असलेले सर्वजण ‘अनलॉक’ ची आतुरतेने वाट बघत होते. मनोरंजनसृष्टीही पांगळी झाली होती, कारण कुठल्याही शूटिंग्सना परवानगी नव्हती. परंतु चित्रपट निर्माते, दिग्दर्शक घरी बसून असले तरी त्यांच्या डोक्यात पुढचे विचार सुरूच होते. म्हणूनच ‘लॉकडाऊन’ ‘अनलॉक’ होताहोताच निर्माते सतीश सामुद्रे यांनी आपला आगामी चित्रपट ‘बबली’ चा ‘फर्स्ट लूक’ ‘अनलॉक’ करण्याचे ठरविले आहे. खरंतर, हा निर्णय धाडसी असला तरी त्यांच्या पुढाकारामुळे इतर निर्मात्यांसाठी आपापले चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हा निर्णय प्रेरणादायी ठरू शकेल.
विषयाचे वेगळेपण ही मराठी चित्रपटांची ओळख झाली आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या विषयावर आधारित एक नवीन ‘बबली’ हा सिनेमा प्रेक्षकांसाठी येत आहे.आता ‘बबली’ म्हटले तर सुप्रसिद्ध चित्रपट, ज्याचा ‘सिक्वेल’ सुद्धा आला आहे. ‘बंटी और बबली’ चा मनात विचार येणे साहजिकच आहे. परंतु यांच्यात नावाव्यतिरिक्त काहीही साधर्म्य नाहीय. निर्माते सतीश सामुद्रे, कथा देखील त्यांनीच लिहिली आहे, यांच्या ‘बबली’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच अनावरीत करण्यात आला. रॉबर्ट मेघा यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढीस लागली आहे. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी टॅगलाईन असलेला ‘बबली’ हा चित्रपट त्याच्या कथानकाबद्दल बरेच काही सांगून जातो असे वाटत असले तरीही कथानकातील वळणं प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.‘बबली’च्या छायांकनाची बाजू शिवा राव यांनी सांभाळली असून संगीताची जबाबदारी सांभाळलीय प्रकाश प्रभाकर यांनी. प्रकाश प्रभाकर यांच्या गीतांना आवाज दिला स्वप्नील बांदोडकर, मोहम्मद इरफान आणि वैशाली माडे यांनी. चेतन रघु चौधरी हे बबलीचे सहनिर्माते असुन प्रदीप कुमार वर्मा हे ‘बबली’चे सहदिग्दर्शक आहेत संकलन केले आहे सिद्धेश प्रभू यांनी. या चित्रपटाचे एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर योगेश डगवार आहेत तर नृत्यदिग्दर्शक आहेत मयूर अहिरराव. प्रीती चौधरी यांनी कॉस्च्युम डिझाईनिंग केले असून कलादिग्दर्शक आहेत कपिल जोशी.एका भावनिक कथेला मनोरंजनाची झालर असलेला व पॅशन मुव्हीज प्रा. ली. ची प्रस्तुती असलेला ‘बबली’ लवकरच प्रदर्शित होईल
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget