पुन्हा बाजारपेठा फुलू लागल्या

ठाणे - राज्यभरात शहरांतील बाजारपेठा तब्बल ७२ दिवसांच्या विरामानंतर फुलू लागल्या.सगळ्यांचा जिव्हाळ्याच्या असलेल्या पुण्यातील तुळशीबाग परिसराने शुक्रवारी गजबज अनुभवली. तर मुंबई-ठाणे आणि नागपूर शहरांमध्ये सम-विषमबाबत संभ्रमामुळे रस्त्यांवर दुतर्फा दुकाने सुरू झाली. काही काळ त्यामुळे गोंधळ उडाला असला, तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंखेरीज खरेदी करता आली. 
कोणती दुकाने कधी खुली ठेवायची याबाबतचे आदेश जारी करण्यात महापालिकांच्या काही विभाग कार्यालयांकडून झालेला विलंब, तर काही विभागांनी केलेले नियोजन दुकानदारांपर्यंत न पोचल्याने पहिल्याच दिवशी काही शहरांत संभ्रमाचे वातावरण होते. गोंधळामुळे एका बाजूची दुकाने बंद करण्याचे आवाहन पोलिसांना करावे लागले. 
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील राम मारुती रोड, गोखले रोड आणि तलावपाळी भागातील मोठय़ा आस्थापना, ठाणे मुख्य बाजारपेठ, जांभळीनाका भाजी मंडई, खारकर आळी तसेच शहरातील इतर भागात शुक्रवारी सकाळी दुकाने सुरू झाली. दुकानांबाहेर चौकटी आखण्यात आल्याने सामाजिक अंतराचा नियम पाळला जात होता. भिवंडी शहरातही रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. कल्याण-डोंबिवली शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये सर्वच दुकाने खुली झाल्याने गर्दी खूप झाली होती. उल्हासनगरात शहराच्या बाहेरचे अनेक ग्राहक हे घाऊक खरेदीसाठी शहरात आल्याने विविध भागांतील रस्ते गर्दीने फुलून गेले.पहिल्याच दिवशी अनेकजण खरेदीसाठी बाहेर पडल्याने सर्वच शहरांमधील रस्त्यांवर वर्दळ होती. काही ठिकाणी सामाजिक अंतराचे नियम पाळले गेले, तर काही ठिकाणी त्यांची पायमल्ली झाली. दुपारनंतर मात्र खरेदीदारांची गर्दी ओसरली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget